ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

देवगड

देवगड येथे वड ही झाला सुहासिनीच्या पूजेच्या दोऱ्याने पांढराशुभ्र.

देवगड – आज वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती नेवासा तालुक्यातील भूलोकी स्वर्ग म्हणून नावलौकिक असलेले देवगड देवस्थान येथे वटपौर्णिमेच्या निमित्ताने तालुकाभरातील सुहासिनी भगिनी वड पूजण्यासाठी देवगड देवस्थान येथे पहाटेपासूनच यायला सुरुवात झाली होती . आज सुहासिनीचा महत्त्वाचा दिवस म्हणून वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वडाप्रमाणे आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते.

देवगड

त्याच पार्श्वभूमी वरती ठीक 11 वाजून 45 मिनिटांनी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज तसेच उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दत्तात्रय भगवंताची आरती करून पौर्णिमेची महापूजा संपन्न झाली. या वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती नेवासा तालुक्यातील सुवासिनींनी देवगड येथे लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती देवगड परिसर हे नेवासा तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक देवस्थान आहे ह्याच अनुषंगाने आज जिल्हाभरातून सुहासिनि आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाची पूजा करत असतात . त्याच अनुषंगाने आज देवगड नगरीही सुहासिनीने पूर्ण दुमदुमून गेली होती आरती महापूजा नंतर गिडेगाव येथील बाळासाहेब साळुंके यांची महाप्रसादाची पंगत झाली.

तसेच देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली तसेच देवगड देवस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंगिरीजीमहाराज यांनी मंत्र पुष्पांजली म्हटली. याप्रसंगी देवगड भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

देवगड
देवगड

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

देवगड
देवगड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

देवगड
error: Content is protected !!