ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

संतपूजन

नेवासा – नेवासा तालुक्यातील सुरेशनगर जवळील त्रिवेणीश्वर देवस्थान येथील किर्तन मंडपात सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित किर्तन व संतपूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भगवंतांचे नामचिंतन हे मनुष्य जीवाला तारणारे असल्याने नामचिंतनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रभाव वाढवा असे आवाहन यावेळी महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलतांना केले.  
       आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या परिवाराच्या वतीने संतपूजन व किर्तन  सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या समवेत उपस्थित संत महंतांचे संतपूजन सरपंच कल्याणराव उभेदळ,अजय उभेदळ,विजय उभेदळ यांच्या हस्ते करण्यात आले.

संतपूजन

यावेळी बोलतांना हभप उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले की जगात आई सारखे दैवत नाही,अनेक मातांनी आपल्याला राष्ट्र व राज्याला राष्ट्र पुरुष दिले,या मातांनी या राष्ट्र पुरुषांवर केलेल्या संस्काराने समभावाची शिकवण समाजाला दिली असे सांगून त्यांनी राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची उदाहरणे झालेल्या किर्तन प्रसंगी दिली.जन्मदात्री आई हे एक तीर्थक्षेत्र प्रमाणे दैवत असून शेवटच्या श्वासापर्यंत आईवडीलांची सेवा करा,भगवंतांचे नामचिंतन हे मनुष्य जीवाला तारणारे असल्याने नामचिंतनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रभाव वाढवा असे आवाहन केले.

संतपूजन

यावेळी झालेल्या संत पूजन सोहळयाच्या प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे प्रमुख महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज,मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग,आमदार शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयनदादा गडाख,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी संतपूजन सोहळयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.या सोहळयाच्या प्रसंगी शिनाई देवस्थानचे महंत श्री आवेराजजी महाराज,ज्ञानेश्वर महाराज हजारे, नितीन महाराज हारकल,चंद्रकांत महाराज म्हसलेकर,कृष्णा महाराज हारदे,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, लक्ष्मण महाराज नांगरे,सचिन महाराज पवार,के.एम.बाबा फाटके महाराज,विष्णू महाराज सांगळे,गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर होमगार्ड कमांडर पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी नेते मंडळी,वारकरी सेवेकरी,युवक मंडळाचे कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतपूजन
संतपूजन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संतपूजन
संतपूजन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संतपूजन
error: Content is protected !!