ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

पाचेगाव – नेवासा तालुक्याचे आमदार शंकराव पाटील गडाख यांच्या संकल्पनेतून नेवासा तालुका बचत गट प्रणेत्या सौ सुनीताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व शारदाताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील बचत गटाच्या महिला सदस्यांना वटपोर्णिमाचे औचित्य साधून साधारण १२५ ते १५० चिंच, आवळा ,वड ,जांभूळ ,पळस या सारख्या वृक्षांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामध्ये महिलांनी घरासमोर रानात बांधावर धार्मिक स्थळांसमोर नेवासा तालुक्यातील शंभर गावांमध्ये महिलांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत वृक्षारोपण केले.


कोरोणा काळात ॲाक्सिजनची कमतरता भासत होती , निसर्ग आपल्याला भरभरून ॲाक्सिजन पुरवतो,त्याची कृतज्ञता व निसर्ग राखण्यासाठी नेवासा तालुक्यातील महिला बचत गटातील बचत गट समन्वयक सभासद सदस्य महिला यांना वटपोर्णिमा उत्सवानिमित्ताने “ एक झाड लावुया “ हा कृतीशील कार्यक्रम करण्याचे आवाहन सौ सुनीताताई गडाख यांनी केले होते.यासाठी नेवासा तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत वटपौर्णिमा निमित्ताने गावागावात वृक्षारोपण करून आगळा वेगळा वट सावित्री पौर्णिमा साजरी केली.

वृक्षारोपण


गेल्या चार वर्षांपासून आमदार शंकराव पाटील गडाख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आता पर्यन्त या माध्यमातून तालुक्यातील महिला बचतगटाच्या सहकार्याने जवळपास अडीच ते तीन हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे केलेल्याला वृक्षारोपणचे संगोपन देखील चांगले प्रकारे करण्यात येत आहे.हा उपक्रम आपण आ गडाख यांच्या नेतृत्वाखालील असाच पुढे चालू ठेऊन महिलांच्या सहकार्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहे.
सुनीताताई गडाख- मा सभापती पंचायत समिती, नेवासा

वृक्षारोपण
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
error: Content is protected !!