ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाळू

नेवासा –तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नं. ३९ मधील क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे अंदाजे ११८ ब्रास वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदारांनी दत्तात्रय घमाजी गवळी यांना ४७ लाख ३२ हजार ३०० रुपये दंडाची नोटीस बजावली होती, मात्र सदर दंडाची रक्कम न भरल्याने दत्तात्रय घमाजी गवळी यांच्या सात-बारा उताऱ्यावर ४७ लाख ३२ हजार ३०० रुपये बोजा चढविण्यात आला आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मंडलाधिकारी यांनी पाहणी केली असता अनधिकृतपणे अंदाजे ११८ ब्रास उत्खनन केले असल्याबाबत पंचनामा व अहवाल तहसीलदार यांना सादर केला होता.

वाळू

त्यावरून दत्तात्रय घमाजी गवळी यांना ४७ लाख ३२ हजार ३०० रुपये दंडाची नोटीस बजावली होती. श्री. गवळी यांनी सादर केलेला खुलासा मान्य नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये एकूण रक्कम रुपये ४७ लाख ३२ हजार ३०० दंड रकमेचा बोजा श्री. गवळी यांच्या सातबारा उताऱ्यावर चढवून त्यांची दिनांकित स्वाक्षरीची प्रत तहसील कार्यालयास तात्काळ सादर. करावी, असे आदेश तहसीलदारांनी बहिरवाडीच्या कामगार तलाठ्यांना दिले होते. त्यानुसार दत्तात्रय घमाजी गवळी यांच्या हिस्स्याच्या क्षेत्रावर फेर नंबर २०२७ नुसार ४७ लाख ३२ हजार ३०० रकमेचा बोजा चढविण्यात आला आहे.

newasa news online
वाळू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू
error: Content is protected !!