ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

नेवासा -काशीविश्वेश्वर मंदीरातील दान पेटी फोडून त्यातील रक्कम चोरणारा आरोपी नेवासा पोलिसांनी पाच तासांच्या आत जेरबंद केला. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस स्टेशन नेवासा येथे दि. 25.06.2024 रोजी फिर्यादी नामे संतोष हिरामण कुंढारे (वय 42 वर्षे) व्यवसाय शेती रा. कोर्ट गल्ली नेवासा खुर्द ता. नेवासा जि. अहमदनगर यांनी समक्ष येवुन फिर्याद दिली की, दिनांक 23.06.2024 रोजी रात्री 11.00 ते रात्री 11.45 वाजण्याचे दरम्याण काशीविश्वेश्वर मंदीर नेवासा खुर्द ता. नेवासाचे गाभाऱ्यातील व आवारातील एकुण कुलूप बंद असलेल्या तीन दानपेट्यांचे कुलूप एका अनोळखी इसमाने बंद मंदीराचे भिंतीवरुन आत उडी मारुन कटावणीचे सहाय्याने तोडुन त्यातील रोख रक्कम अंदाजे 8,000/- ते 10,000/- रुपये फिर्यादी यांचे संमतीशिवाय, लबाडीचे ईराद्याने व स्वतःचे फायद्या करीता चोरुन नेले म्हणुन भारतीय दंड संहिता कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेणेकामी लागलीच पोलीस निरीक्षक श्री.धनंजय अ. जाधव यांनी अधिनस्त असलेले पोलीस अंमलदार पोहेकॉ प्रविण कुसळकर, पोहेकॉ राजेंद्र केदार,पोना/शहाजी आंधळे, पोकों/गणेश फाटक अशा अंमलदारांचे पथक तयार करुन आरोपीचे शोधाकरीता रवाना केले असता प्रथम मंदीराच्या आजुबाजूच्या परीसराची पाहणी केली असता मंदीर परीसरामध्ये CCTV कॅमेरा लावलेला असल्याने सदरच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज प्राप्त केले त्यामध्ये पाहणी केली असता मंदीरातील दानपेटीतील पैशांची चोरी करत असताना महेश अशोक गोंजारी रा. नेवासा बुद्रूक असा दिसला त्यावरुन नमुद पथक लागलीच सदर आरोपीच्या शोधा करीता त्याचे राहते गावामध्ये गेले असता,

तो त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस निरीक्षक श्री.धनंजय अ. जाधव यांचे समक्ष हजर केले असता त्याने सांगितले की, काशीविश्वेश्वर मंदीरामधील दानपेट्यातील पैशांची चोरी मीच केली आहे अशी त्याने कबुली दिली आहे. तरी आरोपी महेश अशोक गोंजारी यास सदर गुन्ह्यांत अटक करुन पुढील तपास हे पोना/शहाजी आंधळे हे करीत आहेत. तसेच यापुर्वी सुध्दा नेवासा खुर्द शहरामधील मळगंगा देवी मंदीरातील दान पेट्यातील पैसे चोरी करणारे आरोपी गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्यात आले होते.

newasa news online
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी
error: Content is protected !!