ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जिल्हा पुरवठा अधिकारी

नेवासा – शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचे इ के वाय सी प्रमानी करण बंधनकारक आहे ज्यांचे इ के वाय सी प्रमानीकरण होणार नाही अशा सदस्यांना धान्य लाभातून वगळले जाणार आहे, म्हणून प्रत्येकाने केवायसी प्रामाणिकरण 30 जून पर्यंत करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमाताई बडे यांनी केले. नेवासा येथे धान्य दुकानदारांच्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी बडे बोलत होत्या.

यावेळी जिल्हा पुरवठा उप अधिकारी मीनाक्षी चौधरी ,नायब तहसीलदार किशोर सानप ,पुरवठा निरीक्षक वैशाली गंदी गुडी ,पुरवठा कार्यालयातील सौ प्रतिभा दहिफळे ,डोळस साहेब, ई पॉज मशीनचे समन्वयक भूषण शिदोरे उपस्थित होते
जिल्हा पुरवठा अधिकारी हेमाताई बडे म्हणाल्या की धान्य घेत असलेले लाभार्थी सत्य व पात्र असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात द्यावयाची आहे. त्यानुसार नाशिक विभागाचे आयुक्त डॉ प्रवीण गेडाम ,उपायुक्त प्रज्ञा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ई केवायसी प्रामाणिकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वस्त धान्य योजनेतील बोगस लाभार्थी शोधणे ,पात्र नसताना सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचे लाभ घेणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना वगळताना पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

त्यामुळे ही इ के वाय सि प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य लाभार्थी ,अंत्योदय लाभार्थी धान्याचा लाभ घेतात. आशा प्रत्येक सदस्याने इ केवायसी प्रामाणिकरण 30 जून पर्यंत करणे आवश्यक आहे. ज्यांचे केवायसी प्रामाणिकरण होणार नाही अशा सदस्यांना धान्य लाभातून वगळले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी पात्र सदस्यांनी केवायसी प्रामाणिकरण वेळेत करून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे.

newasa news online
जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्हा पुरवठा अधिकारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्हा पुरवठा अधिकारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी
error: Content is protected !!