ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बी.सी.ए.

नेवासा – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठाने नुकताच उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला. यामध्ये तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित बेल्हेकर बी.सी.ए. कॉलेजचा ऑफलाईन परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला. सर्व वर्गातून प्रथम वर्षातील बी.सी.ए. विभागातील अदिती ज्ञानेश्वर पुंड (९५.६० टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला, निशिगंध राजेंद्र दळे (९५.२० टक्के) हिने द्वितीय व ऋतुजा अरुण पाचपुते (९२.६० टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. बेल्हेकर बी.सी.ए. महिला महाविद्यालयचा उत्कृष्ठ निकालाची परंपरा राखत विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केले.

बी.सी.ए.

वर्गनिहाय निकाल खालील प्रमाणे: प्रथम वर्षातील बी.सी.ए. विभागातील निकिता केशव वानरे (८३.६० टक्के), त्रिवेणी भानुदास सोनवणे (८३८० टक्के), आरती गणपत पुंड (८३ टक्के), द्वितीय वर्षातील बी.सी.ए. विभागातील शिल्पा नवनाथ शेंडे (७९.४० टक्के), रुपाली प्रल्हाद ससाणे (७३.४० टक्के), दीपाली सुरेश गरगडे (७४.२० टक्के), तृतीय वर्षातील बी.सी.ए.तील यशस्विनी अनिल कदम (८०.२० टक्के), प्राची प्रसाद कडेल (७८.८० टक्के), पूजा काशिराम चव्हाण (७८.८० टक्के) हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थिनींना प्रा. जितेंद्र कोळी, प्रा. मंजुषा शिंदे, प्रा. गौरव लांडगे, प्रा. अजय बावीस्कर, प्रा.स्नेहल खुळे आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे एच. जे. आहिरे यांनी सांगीतले. संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर आणि एच. जे. आहिरे यांनी गुणवंताचे कौतुक केले.

newasa news online
बी.सी.ए.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बी.सी.ए.
बी.सी.ए.

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बी.सी.ए.
error: Content is protected !!