ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शेती

नेवासा – तालुक्यातील सुरेगाव येथे महिला शेतकऱ्यां चे प्रशिक्षण व सन्मान उपक्रम उत्साहात पार पडला.महाराष्ट्र शासनाच्या कृषी संचालनालय पुणे अंतर्गत महिला शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व सन्मान उपक्रम संजीवनी पंधरवड्यातील दिनांक 27 जून 2024 रोजी मेळावा घेऊन उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी महिला सौ.शोभनाताई गणगे होत्या.महिला शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोक ढगे यांनी मार्गदर्शन करताना प्रतिपादित केले की शेतीमधील बहुतांशी सर्व मशागतीची कामे महिला करतात,

तेव्हा शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान प्रामुख्याने त्यांना दिल्यामुळे कृषी मालाच्या उत्पादनात निश्चित वाढ होईल जमिनीचे आरोग्य, बीज प्रक्रिया, समतोल खतांचा वापर, पाण्याचे नियोजन व्यवस्थापन तसेच कीड व रोगांचा बंदोबस्त यावर डॉक्टर ढगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे म्हणाले की शेती विकासाच्या खऱ्या नाड्या महिलांना अवगत असतात त्यामुळे त्यांना त्यासोबत नवीन तंत्रज्ञान जोड देणे काळाची गरज आहे.या कार्यक्रमाला प्रगतशील महिला शेतकरी जयश्री गणगे, मंदाबाई निंबाळकर, निर्मला गंगे, गीता वांडेकर, दिपाली गणगे, लताबाई खैरे, आजाबाई गुंजाळ, सिंधुताई गणगे, कृषी सहाय्यक दिगंबर लोखंडे, पुष्पा वीर, वैशाली काकडे, सेवा सोसायटीचे चेअरमन संपतराव गणगे, प्रगतशील शेतकरी विजय गणगे, पांडुरंग गणगे, नाना गणगे उपस्थित होते.

शेती

याप्रसंगी प्रगतशील महिला शेतकरी सगुनाताई गणगे, सौ.वैष्णवी गंगे, दिलीपराव खैरे यांनी शेती संदर्भातील अनुभव सांगितले.मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके म्हणाले की शेतीचे व महिलेचे नाते मायलेकी सारखे प्रेमळ झालेले असते.त्यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली.त्याचबरोबर शेती संदर्भ उद्योजकता मोहिमेत महिलांना प्राधान्य देऊ असे आश्वासित केले.सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्रीमती कीर्ती सूर्यवंशी यांनी करून सर्वांचे आभार मानले.

शेती
newasa news online
शेती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेती
शेती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेती
error: Content is protected !!