ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर

नेवासा – तालुक्यात विठ्ठल रुक्माई ज्ञानदेव तुकाराम चा गजर घुमण्यास आणि दिंड्यांनी तालुक्यात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे विदर्भ मराठवाड्यासह तालुक्यातील पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान सह इतर सेवेसाठी नेवासा तालुका सज्ज झाला आहे विदर्भ मराठवाडा सह नेवासा तालुका आणि श्रीरामपूर तालुक्यातील काही भागातून जाणाऱ्या सर्व दिंड्या या ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीला आपला माथा टेकवून पंढरपूर कडे जातात वारकरी पंथाचे जन्मस्थान असलेल्या नेवासा येथील ज्ञानेश्वरी लिखाण स्थान आणि या लेखन कार्याचे मूर्तीमंत साक्षीदार असलेल्या त्या करवीरेश्वराच्या खांबाला पुरातन काळापासून वारकरी संप्रदाय ‘पैसा’चा म्हणजे अध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक मानतो या खांबाच्या दर्शनाने आपल्याला पंढरीच्या वारीचे अर्धे पुण्य मिळते आणि या दर्शनानेच पंढरीची वारी पूर्ण होते.

अशी वारकऱ्यांची भावना आहे त्यामुळे आषाढी वारी करणारा या परिसरातील प्रत्येक भाविक आषाढी वारीला जाताना अथवा आषाढी वारीहुन आल्यानंतर पैसाचे दर्शन घ्यायला हमखास येतो. हजारोंच्या संख्येने विठू नामाचा गजर, भजन, प्रवचन, कीर्तन करीत पायी चालणाऱ्या. या थकलेल्या जीवांचा ज्ञानेश्वर मंदिरासह संभाजीनगर ते अहिल्यानगर महामार्ग परिसरातील विविध गावांमध्ये अथवा वस्त्यांवर मुक्काम असतो

मुक्कामाच्या ठिकाणी या वारकऱ्यांना चहा ,रात्रीचे जेवण ,विश्रांती व सकाळचा नाष्टा यासह सकाळच्या प्रातर्विधीचे सर्व सोय स्थानिक यजमान गाव करीत असते सेवाभावातून केलेली ही वारकऱ्यांची सेवा वारीचे पुण्य देते अशी भावना आहे स्वागतासाठी महामार्ग विविध गावात छोट्या-मोठ्या कमानी देण्यात आलेले आहेत

ज्ञानेश्वर

मागील वर्षी विदर्भ मराठवाड्या तील वारकऱ्यांच्या 108 दिंड्यांनी तर निवासी तालुक्यातील 129 गावातील सुमारे 100 दिंड्यांनी आषाढी एकादशीच्या आधी ज्ञानेश्वर दर्शनासाठी भेट दिली ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आलेल्या दिंड्यांचे स्थानिक प्रशासन उत्साहात स्वागत करते या ठिकाणी मुबलक पाणी आहे या दिंड्यांना फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच इंडियन राहण्यासाठी विविध खोल्या उपलब्ध आहेत आणि ज्या दिंड्यांची मुक्कामी जेवणाची सोय नसेल ती जबाबदारी देखील ज्ञानेश्वर मंदिर उचलते असे संस्थांचे अध्यक्ष पांडुरंग यांनी सांगितले.

newasa news online
ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर
error: Content is protected !!