ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. १ जुलै रोजी कृषिदिनाचे औचित्य साधुन भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय संस्था संचलित कृषि महाविद्यालय येथील कृषिकन्यांनी गावातून व्रुक्ष दिंडी काढत वृक्षारोपण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला घोडेगाव येथील कृषि सहाय्यक गणेश भराट यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. विद्यालयातील कृषिकन्यांनी उपस्थित शेतकरी , ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या काळात आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे.

वृक्षारोपण

हे जर आपणास थांबवायचे असेल तर त्यासाठी वृक्षारोपण हे गरजेचे आहे. जेणेकरून मानवी जीवन सुखमय होईल असे भराट यांनी बोलताना सांगितले. या वेळी सरपंच राजेंद्र देसर्डा, उप. सरपंच यशवंत येळवंडे,तलाठी राजेंद्र भुतकर,पोलीस पाटील बाबासाहेब वैरागर, शाळेचे शिक्षक शेख, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, उपस्थित होते. कृषिकन्या प्रांजल कांबळे, म्रुणालिनी रायकर, स्नेहल शिंदे, प्रतिक्षा शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडला. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबतमठ, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एम आर माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. यु व्ही महाजन, प्रा. जे बी खकाळे , प्रा.सागर सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
error: Content is protected !!