ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

थकबाकी

नेवासा – तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे गावातील हद्दीत असलेल्या इलेक्ट्रिक पोल व ट्रान्सफार्मर याचा कर आकारलेला आहे त्याची थकबाकी १ कोटी ४३ लाख ५० हजार रु.एवढी आहे.त्याची नोटीस कंपनीस बजावली असून थकबाकी न भरल्यास कंपनीची मालमत्ता सील करणार असल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले आहे. सौंदाळा ग्रामपंचायतने माणगाव ग्रामपंचायत जि.रायगड च्या धर्तीवर विद्युत वितरणच्या पोल व ट्रान्सफार्मरला कर आकारणी केलेली आहे २०२१ पासून ग्रामपंचायतने सातत्याने नोटीस द्वारे कर मागणी केलेली आहे.

थकबाकी

त्याबाबत कार्यकारी अभियंता ग्रामीण यांनी त्यांच्याच विभागास अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना मूल्यांकन करण्यासाठी पत्र दिलेले आहे परंतु पुढे कुठलीही कारवाई झाली नसल्याने ग्रामपंचायतने पुन्हा नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी ११ ऑगस्ट २०२१ मध्ये ग्रामपंचायतीला विद्युत वितरणच्या पोल व ट्रान्सफार्मर या मालमत्तेवर कर आकारणी करण्यासाठी माणगाव जि रायगड या ग्रामपंचायततीस परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सौंदाळा ग्रामपंचायतने देखील कर मागणी केलेली आहे
सदर थकबाकी तातडीने न भरल्यास सील बंद कारवाई करणार असल्याची नोटीस बजावलेली आहे.
सौंदाळा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या २२० केव्ही सबस्टेशनला ग्रामपंचायतने दर वर्षाला १८ लाख ७२ हजार ८७१ रु. आकारून वसुल देखील केलेले आहेत.त्याच पद्धतीने विद्युत वितरण कंपनी कडून वसुल करणार असल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले आहे.

थकबाकी
newasa news online
थकबाकी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

थकबाकी
थकबाकी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

थकबाकी
error: Content is protected !!