ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जनजागृती फेरी

नेवासा – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत.१ जुलै पासून सुरू झालेल्या नवीन कायद्यांची प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी नेवासा शहरातून फेरी काढण्यात येवुन जनजागृती करण्यात आली.

जनजागृती फेरी


पोलीस स्टेशन पासुन जनजागृती फेरीस सुरुवात करण्यात आली. श्री खोलेश्वर गणेश मंदिर,श्री मळगंगा चौक, नगरपंचायत चौक, डॉ.हेडगेवार चौक, मार्गे औदुंबर चौकात उपस्थित नागरीकांना या कायद्याची माहिती देण्यात आली त्यानंतर श्रीरामपूर रस्त्याने पुन्हा पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला.
नवीन कायद्यांनुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत.१ जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यांवर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच १ जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंद केली जाईल. कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल.

जनजागृती फेरी


कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहेत.
नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकरणांची चौकशी आणि सुनावणी केली जाईल. गुन्ह्यांसाठीची प्रचलित असलेले कलम आता बदलण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालय, पोलीस आणि प्रशासनालाही नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे

नवीन कायद्यांमुळे न्याय व्यवस्थेला गती मिळेल त्याच प्रमाणे फौजदारी गुन्हात शिक्षेचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन गुन्हेगारी आटोक्यात येईल. – ॲड सादीक शिलेदार..

जनजागृती फेरी
newasa news online
जनजागृती फेरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनजागृती फेरी
जनजागृती फेरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनजागृती फेरी
error: Content is protected !!