ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बहिण माझी लाडकी

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव मध्ये बहिण माझी लाडकी साठी शासकीय दाखले मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात सकाळ पासून ते संध्याकाळ सहा पर्यन्त गर्दी पाहायला मिळाली.जवळपास तलाठी राहुल साठे यांनी साडे चारशे उत्पन्न दाखले नागरिकांना देण्यासाठी तत्परता दाखवून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तलाठी कार्यलाय सुरू ठेवले. या योजनेत मात्र राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून घोषित केलेली बहिण माझी लाडकी योजनेला विविध शासकीय दाखलेच अडसर ठरू पाहत आहेत.

योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना डोमेसाईल (रहिवासी प्रमाणपत्र) आवश्यक असून हे प्रमाणपत्र काढताना विवाहित महिलांच्या नावात बदल झालेला असल्याने त्यांनी कोणत्या नावाने दाखला काढावा, योजना राबवणारे महिला बालकल्याण विभाग तो ग्राह्य धरणार का? जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नसणाऱ्या महिलांना रहिवासी प्रमाणपत्र कसे मिळणार? असे अनेक प्रश्न या योजनेत सहभागी महिला व नागरिकांना पडले आहे. यासह ६१ ते ६४ वयोगटातील महिला योजनेतून
सुटणार असल्याने त्यांना कोणता आणि कसा लाभ देण्यात येणार असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत.

बहिण माझी लाडकी

दरम्यान, ‘बहिण माझी लाडकी’ योजना राबवण्यासाठी आज महिला बालकल्याण विभागाची राज्य पातळीवर विवाहानंतर नाव बदलत असल्याने डोमेसाईल काढण्यात येणार अडचण, जन्माचा, शाळा सोडल्याचा दाखला नसणाऱ्या मोठ्या प्रमाणात या योजनेतून महिला वंचित राहण्याची भीती ग्रामीण भागातील महिला करीत आहे.
या योजनेत अडसर ठरणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात यावे अशी मागणी ग्रामीण भागातील महिला करीत आहे.या जाचक अटी मुळे खरे लाभार्थी महिला या योजने पासून वंचित राहू शकतात,त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वसामान्य पर्यन्त पोहचविण्यासाठी जाचक अटी रद्द करण्यात यावे.

बहिण माझी लाडकी
बहिण माझी लाडकी
बहिण माझी लाडकी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बहिण माझी लाडकी
बहिण माझी लाडकी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बहिण माझी लाडकी
error: Content is protected !!