ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दूध

नेवासा – महाराष्ट्र शासनाने दूध दरवाढीच्या आंदोलनावर सकारात्मक निर्णय घेत अनुदान सुरू करणार असल्याची घोषणा केली एक जुलैपासून दूध अनुदान सुरू करण्यात येत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या कानावरील टॅग नोंदणी करून घ्यावी असे आवाहन नेवासा तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब डौले व पंचायत समिती पशुधन विकास विस्तार अधिकारी तेजस घुले यांनी केले आहे

दूध अनुदान देण्यासाठी शासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे त्या साठी सर्व गाय प्रवर्गातील जनावरांच्या कानाचे टॅग नोंदणी आवश्यक आहे तसेच पशुपालकांच्या आधार कार्डातील नावातील व गावातील बदल तसेच नवीन जनावरांची नोंदणी करून घेणे या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी पशुपालकांनी ताबडतोब आपल्या क्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये अधिकाऱ्यांकडे अपडेट नोंदणी करून घ्यावी लागणार आहे.

दूध

अनुदानासाठी टॅगिंग झालेले हवे व त्याची नोंद भारत पशुधन ऍप वर नोंदवलेले वअपडेट केलेले असणे गरजेचे आहे त्यासाठी पशुपालकांनी आपल्या नावाची दुरुस्ती करून घेणे बाबत आवाहन करण्यात येत आहे

नेवासा तालुक्यामध्ये एक लाख बावन्न हजार पशुधन आहे पैकी 122566गाय व 28648म्हैस वर्गातील पशुधन आहे या जनावरांचे पावसाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे लसीकरणाचे कार्य पूर्ण होत आलेले असल्याचे सांगण्यात आले.

newasa news online
दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध

error: Content is protected !!