ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मंदिर

नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ व शहरातील इंजिनियर्स ग्रुप सदस्य भास्करराव शिंदे यांच्या संकल्पनेतून लोकवर्गणीतून ज्ञानेश्वर मंदिरातील तळघरामध्ये ध्यान मंदिराची निर्मिती करण्यात आली असून त्याचे लोकार्पण ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग होते.

प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे ज्ञानेश्वर महाराज, नंदकुमार खरात महाराज व ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक गायत्रीताई वाघ उपस्थित होत्या. देविदास महाराज म्हस्के यांनी सांगितले नेवासा शहरवासी यांचे नशीब अत्यंत चांगले आहे त्यांना ध्यानासाठी अत्यंत चांगली भूमी आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पायाशी- ध्यान मंदिर उपलब्ध झाले आहे याचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा कारण या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा लौकिक वावर आहे. अध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले की ध्यान मंदिराची कल्पना सुचणे हीच मोठी घटना आहे. या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देणाऱ्या सर्व इंजिनियर्सचे त्यांनी कौतुक केले. विवेकानंद आश्रमाचे ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीमती वाघ यांनी देखील ध्यानाचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले.

मंदिर

प्रास्ताविक सुनील वाघ यांनी केले. सूत्रसंचालन निलेश जोशी यांनी केले तर आभार डॉ. संजय सुकाळकर यांनी मानले. उपक्रमाला सहाय्य करणाऱ्या सर्वांचा विश्वस्त रामभाऊ जगताप, कैलास जाधव, संभाजी पवार, पुष्कर शिंदे यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहज ध्यान योगाचे सर्व सदस्य महेश मापारी, योगेश रासने, नितीन खंडाळे, सतीश पिंपळे, जयकुमार गुगळे, डॉ. अर्जुन शिंदे, अभय गुगळे, बाळासाहेब शिंदे,जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे उपस्थित होते.

newasa news online
मंदिर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मंदिर
मंदिर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मंदिर
error: Content is protected !!