ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अध्यक्ष

नेवासा – अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा शाखेची बैठक दि.७जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती.बैठकिच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉ.दशरथ हासे होते.बैठकीच्या सुरवातीला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ.अतुलकुमार अंजान व अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ.प्रेमाताई पुर्व यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेल्या २वर्षातील कामकाजाचा अहवाल जिल्हा सचिव कॉ.बन्सी सातपुते यांनी मांडला.त्यावर कॉ.लक्ष्मण नवले,बापु राशिनकर,श्रीधर आदीक,गोरक्ष मोरे,भुलाबाई आदमणे,भारत अरगडे,ॲड.ज्ञानदेव शहाणे ,बहिरनाथ वाकळे,रमेश नागवडे यांनी चर्चेत भागीदारी करुन किसान सभेचे काम अधिक जोमाने करण्यासाठी विविध सुचेना केल्या.

अध्यक्ष

शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा.हमी भावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा ठरवला.कांद्याला किमान ४०००रु. हमी भाव द्या.दुधाला अनुदान नको तर गाईच्या दुधाला ४०रूपये तर म्हशीच्या दुधाला ६०रु.हमी भाव द्या.पिक विमा कंपन्यांच्या लाभाचे धोरण बदला .कापसाला येत्या हंगामात १२ हजार रुपये हमीभाव जाहीर करा.तर सोयाबीन ७०००रू.दर द्या.कृषी निविष्ठा,बि बीयाणे किटकनाशके जी.एस.टी मुक्त करा.आदी मागण्याचे सदर बैठकित ठराव करण्यात आले.एकीकडे शेतीसाठी आवश्यक असणारे खते, बियाणे किटकनाशके यांची प्रचंड भाववाढ करून शेतीमालाला किरकोळ आधारभूत किंमत वाढवून सरकार शेतकर्यांनी चेष्टा करत असल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.व वरील मागण्यांसाठी शेतकरयांना बरोबर घेवून तीव्र संघर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. अध्यक्षपदी बबनराव सालके पारनेर यांची तर सचिवपदी अप्पासाहेब वाबळे नेवासा यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी प्रा.लक्ष्मण डांगेसर तर उपाध्यक्षपदी बापुराव राशिनकर व गोरक्षनाथ मोरे तर सुरेश बागुल यांची निवड करण्यात आली .प्रा.बबनराव नवले.बहिरनाथ वाकळे विकास गेरंगे कैलास शेळके बाबासाहेब सोनपुरे सुरेश पानसरे धोंडीभाऊ सातपुते प्रा. बबनराव पवारपांडुरंग शिंदे मारुती शिंदे येल्हूबा नवले अशोक डुबे लता मेंगाळ यांच्यासह २१जणाची कार्यकारिणी व २१जणांचे जिल्हा कौन्सील निवडण्यात आले.खजिनदार पदी भगवानराव गायकवाड यांची निवड करण्यात आली. बैठकीचा समारोप गोरक्षनाथ काकडे यांनी करून नविन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष
newasa news online
अध्यक्ष

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अध्यक्ष
अध्यक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अध्यक्ष
error: Content is protected !!