ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा

लॉ कॉलेज सुरू होणार – माजी प्राचार्य रघुनाथ आगळे सर

नेवासा – नेवासा येथील सौ. कौशल्याबाई रघुनाथ आगळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान नेवासा फाटा संचलित  कौशल्याबाई रघुनाथ आगळे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने नेवासा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीकारक पाऊल पडले आहे,त्यामुळे नेवासा येथे विधी महाविद्यालय सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे सर यांनी दिली.
     यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य म्हणून सेवाकार्य केलेले रघुनाथराव आगळे यांनी सांगितले की येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विधी महाविद्यालय सुरू करण्याकरीता राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.या प्रस्तावाची विद्यापीठामार्फत व सरकार मार्फत छाननी होऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लॉ कॉलेज सुरू करण्यास उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. हा कोर्स तीन वर्षांचा असून प्रवेश क्षमता ६० इतकी आहे.

नेवासा

ज्याने सीईटी परीक्षा दिली आहे  मग तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी तो विद्यार्थी प्रवेशास पात्र रहाणार आहे. नेवासा येथे लॉ कॉलेज सुरू होणार असल्यामुळे ग्रामीण मुला-मुलींची कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय दूर झालेली आहे. नेवासा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फायदा विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.नेवासाफाटा येथील  कडा कॉलनी परिसरात हे कॉलेज उभारण्यात आले असून प्रवेशासाठी इच्छुकांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे यांनी केले आहे.
       श्री ज्ञानेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे व माजी कुलगुरू कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक संस्थांनी आत्तापर्यंत नेत्रदीपक प्रगती केलेली असून चालू शैक्षणिक वर्षापासून नेवासाफाटा परिसरात लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, अनेक मान्यवरांनी आगळे सर यांचे अभिनंदन केले आहे.

नेवासा

   सुरू होत असलेल्या विधी महाविद्यालयात मान्यता प्राप्त शैक्षणिक अनुभव असलेले प्राचार्य व शिक्षकांची नेमणूक केलेली आहे तसेच प्राचार्य रघुनाथराव आगळे आणि डॉ.अशोकराव ढगे सर यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा या विद्यालयास मिळणार असल्याने सदर विद्यालयास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे.

नेवासा येथे जिल्हा सत्र न्यायालय असल्याने त्याचा निश्चित मोठा या विद्यालयाच्या भावी वकिलांना विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी कडा कॉलनी मागे असलेल्या महाविद्यालयात येऊन संपर्क करावा
– माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे

नेवासा
नेवासा
नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा
error: Content is protected !!