ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

लाडकी बहीण

नेवासा – अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पोस्ट कार्यालयामध्ये मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने साठी महिलांना बँक खाते उघडून देण्यासाठी अहमदनगर व श्रीरामपूर येथील पोस्ट विभागाने पुढाकार घेऊन १ जुलै ते ८ जुलै पर्यंत जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे १८ हजार पेक्षा जास्त खाते उघडून दिलेले आहेत.

         इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते उघडल्यामुळे महिलांना सरकार मार्फत थेट लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत नमूद केलेल्या सर्वच योजनांचा लाभ मिळणार आहे व यासाठी महिला स्वतः जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये केवळ आपले आधार कार्ड घेऊन गेल्यास खाते उघडून दिले जात आहे.

लाडकी बहीण

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खाते उघडल्याने पोस्टाच्या देखील अनेक योजनांची माहिती मिळणार आहे व महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.
     महिलांनी पोस्ट कार्यालयात जाऊन किंवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधून खाते उघडून घ्यावे असे आव्हान श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक श्री. हेमंत खडकेकर व इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. स्वप्निल सावंत यांनी केले आहे.

लाडकी बहीण
लाडकी बहीण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लाडकी बहीण
लाडकी बहीण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लाडकी बहीण
error: Content is protected !!