ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चेअरमन

पाचेगाव – अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक १० जुलै रोजी पार पडली.त्यात चेअरमन पदासाठी नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून कारभार पाहणारे सतीश मोटे यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी दिलीप नागरगोजे पंचायत समिती पाथर्डी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे श्री मुटकुळे यांनी घोषित केले. सर्व मान्यवरांचे व नूतन पदाधिकाऱ्यांचे ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या,याप्रसंगी संचालक मंडळ तसेच अशोक नरसाळे सरचिटणीस,युवराज पाटील कार्याध्यक्ष,शरद फाटके मा व्हाईस चेअरमन, गोरक्षनाथ शेळके, प्रदीप कल्याणकर, नफीस खान पठाण यांच्या सह संचालक,सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेअरमन

सतीश मोटे यांचा एकूण २०वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत त्यांनी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष,नेवासा तालुका संघटनेचे सचिव म्हणून देखील चांगले काम पाहिले. संघटने मध्ये ग्रामसेवकांच्या अडचणी सोडवण्याबरोवर त्यांनी सजेच्या गावाचा विकास करणेवर देखील भर दिलेला असून चांगल्या प्रकारे योजना राबवून ग्रामस्थांची मने जिंकलीआहेत. त्याचबरोबर पतसंस्था वाढीसाठी ठेवी वाढवणेचे काम अगदी जोमाने करत आलेले आह़े.त्यांच्या या कामाची दखल घेत राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांची अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमनपदी बिनविरोध निवड करणेत आली.
तसेच त्यांची या निवडीबद्दल पुनतगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुदर्शन वाकचौरे,पत्रकार अशोक तुवर,सर्व सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी व पुनतगाव येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

चेअरमन
चेअरमन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चेअरमन
चेअरमन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चेअरमन
error: Content is protected !!