ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल येथे जमिनीचा निकाल विरोधात गेल्याने एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १२ जुलै रोजी पांढरीपुल येथील एका हाॅटेल समोर जमिनीचा निकाल विरोधात गेल्याचा राग आल्याने फिर्यादी बंडोपंत रंगनाथ हारेर वय ५४ रा. पांढरीपुल पुल मिरी रोड यांचा मुलगा काॅलेजला जात असताना त्या ठिकाणी एकनाथ मोहन हारेर, प्रविण एकनाथ हारेर, महेश एकनाथ हारेर सर्व राहणार खोसपुरी हे आले व त्यास म्हणाले कि तुझा बाप व चुलता हे विनाकारण आमचे विरोधात कोर्टात दावा दाखल करतात असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करत असताना फिर्यादी हे सोडवण्यासाठी मध्ये गेले असता त्यांना देखील मारहाण करत शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र. २९९/२०२४ बि एन एस ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२), (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. सोमनाथ झांबरे हे करत आहेत.

मारहाण
मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
error: Content is protected !!