ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जैविक खत

गणेशवाडी – कृषी महाविद्यालय सोनई येथे जैविक खते उत्पादन तंत्रज्ञान आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय सोनई चे प्राचार्य डॉ. हरी मोरे होते. शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले जैविक खते शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. कमी खर्चात जैविक खतांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी. उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे यांनी कृषीच्या विद्यार्थ्यांना सक्षम उद्योजक व्हावे असे आवाहन यावेळी केले. वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. श्रीकृष्ण हूरुळे यांनी शेतकरी बंधूंना जैविक खते, त्यांचे महत्त्व व वापर याविषयी मार्गदर्शन केले.

जैविक खत

या कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे समन्वयक प्राध्यापिका रूपाली भोसले, प्रा. वरून कडू, प्रा. नरेंद्र दहातोंडे, प्रा. अभिजीत गावडे, प्रा. शुभम टेमगिरे, प्रा. संतोष चौगुले, प्रा. संदीप तांबे, प्रा. सोमनाथ तागड, प्राध्यापिका सुजाता पेरणे, प्रियदर्शनी जाधव, पूजा गिरी, पुष्पांजली भोसले, दिशा चव्हाण, पत्रकार श्री गणेश बेल्हेकर, किशोर निमसे, परिसरातील प्रगतिशील शेतकरी तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच चतुर्थ वर्षाच्या कार्यानुभव आधारित जैविक खते उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्पाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कृषीकन्या मानसी नवले व ऋतुजा सोनुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि संकेत वडावकर याने आभार मानले.

जैविक खत
जैविक खत
जैविक खत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जैविक खत
जैविक खत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जैविक खत
error: Content is protected !!