ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन

नेवासा – आज समर्पण मजदूर संघाच्या वतीने पंचायत समिती नेवासा येथे झालेल्या बांधकाम मजुरांच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व डॉ. करणसिंह घुले व कॉम्रेड ॲड.बन्सी सातपुते यांनी केले. यावेळी नेवासा तालुक्यातून मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. पंचायत समिती प्रशासनाने आदेश देऊनही दाखले न देणाऱ्या ग्रामसेवकांना कायदेशीर नोटीस बजावण्याची तयारी दाखवली. परंतु कामगारांचे समाधान होऊ शकले नाही. जे ग्रामसेवक दाखले देत नाहीत त्यांना तातडीने समोर हजर करा या मागणीवर कामगार ठाम होते.

सरते शेवटी विस्तार अधिकारी कासार साहेब व पाखरे साहेब यांनी ग्रामसेवक संघटना, कामगार संघटना, सहा कामगार आयुक्त कार्यालय अहमदनगर येथील अधिकारी यांची गटविकास अधिकारी यांच्या दालनात समन्वय बैठक घेण्याबद्दल पुढाकार घेतला. या प्रस्तावास सर्व कामगारांनी सकारात्मक विचाराने पाठिंबा दिला. दिनांक 19 जुलै 2024 रोजी ची दाखले देण्याबाबतची समन्वय बैठक होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याबाबत आंदोलकांमध्ये मतैक्य झाले. आणि आंदोलन 19 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. परंतु 19 तारखेनंतर जर दाखले मिळाले नाही तर कामगारांनी कोणतीही पूर्व सूचना न देता तातडीने उग्र आंदोलनाचा इशारा पंचायत समिती प्रशासनाला दिला आहे. यावेळी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांची ही उपस्थिती लक्षणीय होती.

आंदोलन
newasa news online
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन
error: Content is protected !!