ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

नेवासा – तालुक्यातील तामसवाडी येथे तलवारीचा धाक दाखवणाऱ्यावर नेवासा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अविनाश आसाराम कापसे रा. तामसवाडी याने विशाल सावळेराम आयनर याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. दिनांक 12/07/2024 रोजी संध्याकाळी 7/20 सुमारास फिर्यादी अविनाश कापसे हे त्यांचे रहाते घरून गावांमध्ये जात असताना तामसवाडी गावातील जय भवानी कृषी केंद्र जवळ आले असता विशाल सावळेराम आयनर यांनी फिर्यादीस त्यांची मोटर सायकल आडवी लावून माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली म्हणून शिवीगाळ केली व मोटर सायकलला लावलेली तलवार काढून तुला तलवारीनेच मारून टाकतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

तलवार

अविनाश कापसे यांनी या घेटनेचा स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेला व्हिडीओ पोलिसांना दाखवला असता सदर घटनेची पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी गंभीर दखल घेत या बाबतची फिर्याद पोलीस ठाणे येथे नेवासा येथे दाखल झाल्याने भारतीय हत्यार कायदा क. 4(25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37(1)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे विशाल आईनर यास पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल राजु ढाकणे यांचे पोलीस पथक तातडीने तामसवाडी येथे गेले असता आरोपी विशालने तलवार तेथेच टाकून त्याने अंधारात धूम ठोकली.

तलवार

पोलीस ठाणे नेवासा विशालचा शोध घेत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक काळोखे हे करीत आहेत.
चौकट-कायदा हातात घेऊन अशा प्रकारची भीती, दहशत कोणी निर्माण करेल तर त्याला कायद्याच्या साखळ दंडामध्ये जखडले जाईल असा सक्त ईशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला आहे.

newasa news online
तलवार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तलवार
तलवार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तलवार
error: Content is protected !!