ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुरवठा विभाग

नेवासा – तालुक्यातील पुरवठा विभागाचा कारभार चव्हाठ्यावर आला आहे. नेवासा तालुक्यातील कुटुंब संख्या आणि रेशन कार्ड धारक यांच्या आकडेवारीत प्रचंड तफावत आहे.साधारणे रेशन कार्डचे केशरी, पिवळे, शुभ्र रेशन कार्ड असे प्रकार पडतात केसरी व पिवळे कार्ड धारक यांना अन्न धान्य व इतर शासकीय लाभ मिळतो व शुभ्र रेशन धारक यांना सरकारी नियमानुसार शासकीय लाभ मिळत नाही. पण परिस्थिती अशी आहे की आज सरकारी कर्मचारी केसरी कुपन वापरून शासनाची दिशा भूल करून शासकीय लाभ मिळवतात यामुळे जे पात्र लाभार्थी आहे ते मात्र वंचित राहतात सरकारी कर्मचारी यांना सर्व नियम धाब्यावर ठेऊन लाभ दिला जातो व सर्व सामान्य सर्व नियमात असुन देखील त्यांचा हक्कावार डल्ला मारला जातो. मोदी सरकारने कोरोना महामारीच्या काळात २०२० ला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू केली यात धान्य मोफत दिले जाते व चालु वर्षांपासून या योजनेला आणखी ५ वर्षासाठी वाढ देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ तळागाळातील गरजू व्यक्तिना व्हावा हा मूळ हेतू आहे. परंतु या योजनेचा सर्वात जास्त लाभ सरकारी कर्मचारी घेत असल्याचे दिसत आहे तालुक्यातील अनेक शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांबरोबर , इतर सरकारी कर्मचारी यांना शुभ रेशन कार्ड बंधनकारक असतांना बरेच शिक्षक व कर्मचारी केसरी रेशन कार्ड असुन मोफत धान्य घेतात. आणि बाजारात विकतात. जे खरे लाभार्थी आहेत त्यांना मात्र अजून या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. तालुक्यात अनेक नागरिक आहेत की ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असुनही त्यांना धान्य मिळत नाही. केसरी कार्ड धारकाकडून जेव्हा पुरवठा विभाग कडे धान्य मिळणेसाठी अर्ज केला असता, त्या ठिकाणी सांगितले जाते की तुम्ही कुपण ऑनलाईन करा.

पुरवठा विभाग

ऑनलाईन ची प्रक्रिया करणेसाठी संबधित टेबलवर बसलेला व्यक्ती या भाषेत बोलतो कि जणू कूपन ऑनलाइन तो करून आपलेवर उपकारच करत आहे. ऑनलाईन प्रक्रिया झाल्यावर पुरवठा अधिकारी धान्य घेण्यासाठी ग्रामपंचायत ठराव आणा. ग्रामपंचायत सांगते की ज्या लोकांना धान्य मिळते असे लोक शोधून द्या त्यांचे नाव कमी झाले की तुमच्या नावाची शिफरास आम्ही करू . गावाचा कारभारी हा सरपंच, गावचा ग्रामसेवक हा प्रशासकीय अधिकारी असतो यांचेकडे प्रत्येक नागरिकांची कुंडली म्हणजेच नोंद असते. तसेच धान्य दुकान दार यांना सर्व हे खात्रीशीर माहित असते की गावात किती सरकारी कर्मचारी आहेत. कोणाकडे कोणते कार्ड आहे. सरकारी कर्मचारी असताना याचेकडे केसरी कार्ड कसे ? हा सर्व प्रकार राज रोज पणे प्रत्येक गावात सुरू आहे.

सरकार योजना सुरु करते पण सरकारी कर्मचारीच त्याला अडकाठी बनलेले म्हणजे कुंपण च शेत खात आहे अस झालंय.याला कोणाच पाठबळ आहे. ही सरकारी यंत्रणा नेमकी काय काम करते यावर कोणाचे नियंत्रण आहे की सर्व संगणमताने मिल- बाटके सुरु आहे याची सखोल चौकशी होऊन खऱ्या लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळणार आहे की सरकारी कर्मचारी यांचेच घर भरणार हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

BPL रेशन कार्ड – पिवळे रेशन कार्ड दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील नागरिकांना पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जातात. पिवळे रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात धान्य दिले जाते.

केशरी रेशन कार्ड – सामान्य कुटुंबातील नागरिकांना केशरी रेशन कार्ड दिले जातात. या रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशन (धान्य) दिले जाते.पांढरे रेशन कार्ड – अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पांढरे रेशन कार्ड धारकांना कुढलेली शासनाचे लाभ मिळत नाही कारण पांढरे रेशन कार्ड धारक ज्यांचे उत्पादन जास्त आहे अश्या नागरिकांना हे रेशन कार्ड दिले जाते .

पुरवठा विभाग

सरकारी कर्मचारी यांना शुभ्र रेशन कार्ड असने बंधनकारक आहे पण अनेका कडे अजून केसरी कार्ड आहेत. 2. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न व चार चाकी वाहन असणारे केसरी धारक यांना अन्न धान्य योजनेतून वगळल्याचे सांगितले जाते. पण हे अजून कागदावरच आलेले नाही . त्याची अंमलबजावणी नाही.सरकारी कर्मचारी (शिक्षका सह इतर सरकारी कर्मचारी) आहेत त्यांना नोटीस काढुन. त्यांचे केसरी कार्ड जमा करून त्यांना शुभ्र कार्ड देण्यात यावे.आयकर भरणारे, व चार चाकी वाहन वापरणारे यांची यादी जाहिर करून त्यांनचे नावे प्राधान्य यादीतून वगळावे.

newasa news online
पुरवठा विभाग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरवठा विभाग
पुरवठा विभाग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरवठा विभाग
error: Content is protected !!