ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दारु

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका गावठी दारु अड्ड्यावर शेवगाव पोलीसांनी काल कारवाई केली. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार नामदेव रामचंद्र शिंदे वय ५४ रा. सोनई धनगर गल्ली हा घराच्या आडोशाला गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन व तयार गावठी दारु विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

दारु

दि. २३ जुलै रोजी शेवगाव उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक फौजदार रेवंन्नाथ रांझणे यांनी या ठिकाणी छापा टाकत १२०० रुपये किंमतीचे ६०लिटर दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, ३००० रुपये किंमतीची २० लिटर तयार दारु एका प्लास्टिक १५० रुपये किंमतीच्या ड्रम मध्ये असा एकुण ४२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेवगाव उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक फौजदार रेवंन्नाथ रांझणे यांनी सोनई पोलीस ठाण्यात शिंदे याचे विरुद्ध गुन्हा र व कलम ३१३/२०२४ महा. दा. का. कलम ६५(ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. आर लबडे हे करत आहेत.

दारु
दारु
दारु

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारु
दारु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारु
error: Content is protected !!