ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाळू

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी रस्ताचे सध्या बेकायदा गौन खनिज वाहतुकीने तिन तेरा वाजले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे कि गणेशवाडी व लांडेवाडी मार्ग हा सध्या वाळु वाहुतिकीसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुखकर बनला आहे. मात्र सुरू असलेल्या या गौन खनिज वाहतुकीने रस्त्याची हम पुरती चाळण झाली आहे. रात्रभर ही वाहतुक तर असतेच परंतु आता दिवसा देखील ही वाहतुक सुरू असते.ना महसूल चा धाक स्थानिक पोलीस प्रशासनाचा त्यामुळे या वाळूमाफिया चे माती चंगळच होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

सुसाट वेगाने चालणाऱ्या या वाहनांमुळे कित्येकदा अपघात देखील झाले आहेत. लांडेवाडी मध्ये तर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळु साठवलेला साठी असुन या कडे देखील महसूल व पोलीस जाणिवपूर्वक डोळेझाक करत आहेत. आम्ही एका वाहतूक शाखेच्या हवालदारस दरमहा रक्कम देत असल्याने आमचे कुणीही काही करू शकत नसल्याचे एका वाळु माफीया ने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. असेच जर सुरू राहीले तर कसे ? वाहतूक सोडून वाळू माफिया , मुरुमाचे त्याचप्रमाणे अवैध दारू, मटका यांचे हप्ते गोळा करण्यातच हे पोलीस धन्यता मानतात. या कडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून या हप्तेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या मुळे पोलीस प्रशासनाची मोठी बदनामी होत आहे.

वाळू
वाळू
वाळू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळू
वाळू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळू
error: Content is protected !!