ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Nilesh Lanke

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांनी चौथ्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण सुटलं.

Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांचे उपोषण चौथ्या दिवशी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने सुटले. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेकर यांच्याकडे चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी दिले. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलन स्थळावरून पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्याशी फोनवर बातचीत करून उपोषणकर्ते खासदार निलेश लंके यांचे बोलणे करून दिले. चौकशी ही इन कॅमेरा होईल आणि दोषी असल्यास कारवाई केली जाईल, असे लेखी पत्र देखील पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी पाठवले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळ्या असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप लंके यांनी पत्रात केला होता. हप्ते गोळा करणार्‍यांवर पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली होती.

स्थानिक गुन्हे शाखेच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात सर्वाधिक अवैध व्यवसाय चालतात. त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे 360 कोटी रुपयांची वसुली केली जाते. यात सर्वांचीच मिली भगत आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, यासह पोलीस अधीक्षकांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई न केल्यास हे आंदोलन राज्यभरात सुरू होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Nilesh Lanke

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Nilesh Lanke
Nilesh Lanke

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Nilesh Lanke
error: Content is protected !!