ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

अपघात

गणेशवाडी – पांढरी पुल येथील दुपारी झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाले आहेत.समजलेल्या माहिती नुसार नगर मार्गे संभाजीनगर येथे डांबराचे बॅरल घेऊन जाणारा कंटेनर पांढरी पुल येथील इमामपुर घाटात आल्यावर ड्रायव्हर चा कंटेनर वरील ताबा सुटल्याने कंटेनर घाटातच आडवा झाला.

अपघात

त्याच वेळी समोर येणारे पिक अप , व्हॅन देखील त्यावर जाऊन आदळले त्याच वेळी बाजुलाच असलेले खरवंडी येथील अनिल दगडु फाटके वय ४३ व मुलगी दिपाली अनिल फाटके वय २० हे दोघे मुलीच्या अॅडमिशनसाठी नगर येथे जात होते. त्याच वेळी कंटेनर मधून बाहेर पडलेले डांबराचे बॅरल त्यांच्या अंगावर आले व गाडी कंटेनर वरती आदळली त्यामध्ये अनिल फाटके रा. खरवंडी ता. नेवासा हे जागीच मयत झाले तर मुलगी जखमी झाल्याने तिला पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटना स्थळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आपल्या सहकाऱ्यांसोबत काही वेळातच घटना स्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते.

अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात
error: Content is protected !!