ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाजप

नेवासा – तालुका भाजपाचे माजी उपाध्यक्ष व किसान मोर्चाचे पदाधिकारी, गेवराईचे माजी सरपंच सोपानराव कर्डिले यांनी समर्थकांसमवेत भाजपला सोडचिट्टी देत आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश केला.

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने राज्यात अनेकजण भाजप प्रवेश करताना दिसतात. तालुक्यात मात्र २ वर्षापासून अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते गडाख गटात प्रवेश करत आहेत. स्थानिक भाजपचे नेते आपला राजकीय स्वार्थ पाहतात, कार्यकर्त्याना वाऱ्यावर सोडले जाते, कारखाना तसेच अन्य निवडणूकीत अंधारात ठेवून बैठका घेत कार्यकर्त्यांना तोफेच्या तोंडी दिले जाते, असे आरोप कार्यकर्ते पक्ष सोडताना करतात.

सध्या नेवासा भाजपात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे, ऋषिकेश शेटे यांच्या नावाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चर्चा होत आहे. उमेदवारीची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडणार, हे अद्याप स्पष्ट नाही. याउलट आमदार शंकरराव गडाख तालुका पिंजून काढत आहेत. कर्डीले यांनी गडाख गटात प्रवेश करताना स्थानिक भाजप नेतृत्वावर टीका केली. ते म्हणाले,आम्ही विरोधात होतो, पण तालुक्याच्या हितासाठी विद्यमान आमदार गडाख यांचे नेतृत्व योग्य आहे. तालुका भाजपत अंतर्गत कलह आहे. स्थानिक नेत्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही, या सर्व गोष्टीचा विचार करून आमदार गडाख गटात प्रवेश केला आहे.

भाजप

एक महिन्यापासून आमदार शंकरराव गडाख यांनी घोंगडी बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकाना उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेत जाऊन थेट संपर्कासोबत बेरजेच्या राजकारणाची त्यांची रणनीती दिसून येत आहे. तालुक्यातील विरोधी गटात शांतता आहे.

newasa news online
भाजप
भाजप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप
error: Content is protected !!