ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पसायदान प्रतिष्ठान

नेवासा – नेवासा येथील पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून अभियंत्यांचा सन्मान करून अभियंता दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे कार्य देशातील अभियंत्यांसाठी आदर्शवत असे असून देशाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी यावेळी बोलताना केले. नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहात अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन पसायदान प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष मनोज अण्णा पारखे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले.

पसायदान प्रतिष्ठान

कार्यक्रम संयोजक इंजिनियर मनोजअण्णा पारखे यांनी आलेल्या अभियंत्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.देशाच्या जडणघडणीत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंजिनियरचे मोठे योगदान आहे.डॉ.मोक्षगुंडम यांच्या आदर्शवत कार्यामुळेच देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे त्यांनी केलेल्या कार्यातून उतराई होण्यासाठी अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मनोज अण्णा पारखे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
    यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर सुनीलराव वाघ,इंजिनियर महेश मापारी,इंजिनियर आदर्श शिक्षक दत्ता शिंदे यांनी आपल्या मनोगतातून अभियंत्यांचे व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे जीवनकार्य विषद केले.यावेळी उपस्थित अभियंत्यासह अभियंता पित्यांचा सन्मान गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

पसायदान प्रतिष्ठान

यावेळी झालेल्या अभियंता दिन कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर रामदास लष्करे,शुभम उपळकर,राजेश कडू,महेश गायकवाड,श्रीकांत पारखे,अजय पारखे,सागर रासकर,शशिकांत पारखे उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम संयोजक मनोज अण्णा पारखे यांनी उपस्थित अभियंत्यांचे आभार मानले.

newasa news online
पसायदान प्रतिष्ठान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पसायदान प्रतिष्ठान
पसायदान प्रतिष्ठान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पसायदान प्रतिष्ठान
error: Content is protected !!