ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Pathardi Bandh

Pathardi Bandh : पंकजा मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित युवकाच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला होता.

Pathardi Bandh : अहमदनगरच्या (Ahmednaagar News) पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील शिरापूर (Shirapur) येथील एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता.  दरम्यान याबाबत मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डीत बंदची (Pathardi Bandh) हाक देण्यात आली होती.

पंकजा मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित युवकाच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला होता. संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.

या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला पाथर्डी शहर दिवसभर कडकडीत बंद(Pathardi Bandh) होते. यावेळी सर्वपक्षीय मुंडे समर्थकांच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मुंकुद गर्जे, गोकुळभाऊ दौंड, दिलीप खेडकर, अरुण मुंडे, अमोल गर्जे, अरुण मिसाळ, अर्जुन धायतडक, प्रतिक खेडकर, भाऊसाहेब शिरसाठ, संजय बडे, गहिनीनाथ शिरसाठ, हरीहर गर्जे, मृत्युंजय गजें, माणिकराव खेडकर, किसन आव्हाड, शिवनाथ गर्जे, विजय शिरसाठ आदींसह हजारो मुंडे समर्थक सहभागी झाले होते.शहरातील नाईक चौकातून सकाळी निषेध मोर्चाला सुरुवात झाली. हजारो मुंडे समर्थकांनी पोलीस स्टेशन वर जात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. यावेळी मोर्चेक यांनी सदर तरुणाला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी व यापुढील काळात जातीय तणाव निर्माण होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली.

दोन लहान मुलांच्या हस्ते यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना मुटकुळे म्हणाले की, मत मोजणी पुर्वी पोलीस प्रशासनाकडून सर्व समाजाला शांततेचे आवाहन करण्यात आले होते. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे या पुढील काळात समाजातील सर्व घटकांनी व जाती धर्मातील लोकांनी जातीय सलोखा पाळावा. कुणीही सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. या प्रकरणात पोलिसांनी पुढाकार घेऊन सदर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी कारवाई केली जाईल, लवकरच त्याला अटक होईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुटकुळे यांनी यावेळी दिले.(Pathardi Bandh)

यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. शिरापूर येथील एका तरुणाने मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती त्यामुळे संतप्त झालेले शेकडो युवक काल रात्री पोलिस स्टेशनला जमा झाले. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे केली होती.यावेळी काही काळ शिरापुर व पोलिस स्टेशनलाही तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे तालुक्यात तीव्र प्रतिसाद उमटले या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंदची हाक दिली. बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल ओबीसी समाज, सकल वंजारी समाज, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, लोकनेता महोत्सव समिती व दैवत फाउंडेशन यांनी केले होते.

Pathardi Bandh

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Pathardi Bandh
Pathardi Bandh

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Pathardi Bandh