Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्य सरकारकडून नवनवीन माहिती पोस्ट केली जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या योजनेच्य्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
Ladki Bahin Yojana Latest Update : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेला सुद्धा तात्पुरता ब्रेक लागला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाल्याची चर्चा रंगली. मात्र, आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.