ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुढारी

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर व सलाबतपुर परिसर मध्ये मोठी पाणी टंचाई सध्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाहावयास मिळत आहे सलाबतपुर परिसरातील नागरिकांना दररोज 300 ते 500 रुपये मोजून पाणी विकत घेण्याची वेळ सलाबतपुर करांवरती आली आहे.

याच अनुषंगाने सलाबतपुर परिसरामधील नागरिकांची राजकीय पुढार्‍यावरती मोठा रोष पाणीटंचाईमुळे पहावयास मिळत आहे यामध्ये सलाबतपुर, दिघी ,जळका, बाभुळखेडा , गोंडेगाव , मसले, पिचडगाव आदी गावांचा ही समावेश आहे.

या मध्ये सलाबतपुर येथील पाणी पाईपलाईन नादुरुस्त असल्यामुळे सलाबतपुर नागरिकांना मोठी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे त्यामध्ये ग्रामपंचायतचा बोर असून खोळंबा नसून अडचण अशी परिस्थिती आहे त्या बोरला थोडेफार पाणी आहे परंतु त्या बोरच्या शेजारीच गावातील नाला गेल्या मुळे त्या नाल्याचे पाणी त्या बोर मध्ये उतरत असल्याने त्या पाण्याचा सलाबतपुर नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंध येत असल्याने त्याचा पिण्याचे पाण्यासाठी वापर केला जाण्यासारखे पाणी नसल्याचे नागरिकांना सांगितले आहे त्या मुळे सलाबतपुर नागरिकांचा राजकीय नेत्यावरती मोठा रोष पाहायला मिळत आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राजकीय लोक गावांमध्ये ये-जा करतात परंतु सलाबतपुर परिसरातील बरेच नागरिकांनी राजकीय पुढाऱ्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .

गावामध्ये राजकीय पुढारी येतात व गपचुप निघून जातात अशी परिस्थिती सलाबतपुर मध्ये पहावयास मिळत आहे काही ठिकाणी नेवासा तालुक्यामध्ये राजकीय पुढार्‍यांना हाकलूनच लावल्याचे प्रकार ऐकवायला मिळाला आहे.

याच सलाबतपुर परिसरातून नागरिकांचा रोश तसेच नेवासा तालुक्यामध्ये नागरिकांचा रोष राजकीय नेत्यांवरती पहावयास मिळत असल्याने येत्या काळात मतदानातूनच सर्वसामान्य माणूस या राजकीय नेत्यांना काय धडा शिकवणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

https://annews.co.in/horoscope-today-8-april-2024/
पुढारी
पुढारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुढारी
पुढारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुढारी