नेवासा – गुढीपाडवा सणाचे व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून नेवासा येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन प्रांगणात नेवासा प्रेस क्लबने सुरू केलेल्या पाणपोईचे उदघाटन नेवासा तालुक्यातील इमामपूर येथील जंगली महाराज आश्रमाचे महंत बाळकृष्ण महाराज यांच्या हस्ते तहसीलदार डॉ.संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या शुभारंभ प्रसंगी महंत बाळकृष्ण महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. नेवासा प्रेस क्लबने राबविलेला पाणपोई सारखा उपक्रम कौतुकास्पद असल्याचा शुभाशीर्वाद महंत बाळकृष्ण महाराज यांनी यावेळी बोलताना दिला.
नेवासा प्रेस क्लबच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उदघाटन प्रसंगी नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आलेल्या अतिथीचे बुके देऊन स्वागत केले. प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे यांनी प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दिली.प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.नेवासा तालुक्यात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची तृष्णा भागविता यावी म्हणून प्रेस क्लब ने पाणपोई सारखा सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या पाणपोईच्या उदघाटन प्रसंगी तहसीलदार डॉ.संजय बिरादार व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी उपक्रमाला शुभेच्छा देत तालुक्यात विविध कामांसाठी तहसील कचेरीत व पोलीस स्टेशनला येणाऱ्या नागरिकांची चांगली सोय झाली असून त्यांची तहान भागणार आहे असे सांगत त्यांनी पाणपोई सारख्या पवित्र उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी झालेल्या उदघाटन प्रसंगी जंगली महाराज आश्रमाचे सेवेकरी काशीनाथ आयनर,मोहनराव तुवर, इमामपूरचे सरपंच आप्पासाहेब काळे,नेवासा प्रेस क्लबचे सदस्य व जेष्ठ मार्गदर्शक अशोकराव डहाळे,उपाध्यक्ष कैलास शिंदे,नानासाहेब पवार,शाम मापारी,रमेश शिंदे, सुहास पठाडे,शंकर नाबदे,मकरंद देशपांडे, पवन गरुड,अभिषेक गाडेकर उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.