नेवासा – करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहराच्या रस्त्यावर भव्य कमानी उभारण्यात आल्या असून डॉ.आंबेडकर जयंतीच्या स्वागतासाठी नेवासानगरी सज्ज झाली आहे.जयंतीत मद्य प्राशन करून येणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या वतीने घेण्यात आला असून जयंतीचे पावित्र्य राखून जयंती सोहळयामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन उत्सव समितीचे मार्गदर्शक संजय सुखदान यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेबांची जयंती म्हणजे म्हणजे फक्त नाचणे असा याचा अर्थ होत नाही तर या नाचण्यातून सामाजिक प्रबोधन, योग्य ध्येयधोरणे , समाजाची एकजूट , कुठ छोट्याश्या गावात जयंती निघत नसेल तर त्या मनांनही बाबासाहेबांची जयंती काढण्यासाठी प्रेरणा देणारी ही जयंती असल्याचे बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखदान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन येणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला असून यावेळी जो व्यक्ती खांद्यावर घेऊन डिजेसमोर नाचेल त्यावेळी डिजेवरील गाणे ही बंद करण्यात येईल असा ही निर्णय जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला असून सर्वांनी जयंतीचे पावित्र्य राखले जाईल असा प्रयत्न करून सदरची जयंती मंगलमय वातावरणात साजरी करावी,नेवासा येथे सर्वात मोठया प्रमाणात साजरी होणाऱ्या जयंतीसाठी उत्सव समिती कोणाकडून ही वर्गणी घेत नाही त्यामुळे जयंतीच्या नावाने वर्गणी गोळा करून चळवळीला बदनाम करू नये असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नेवासा तालुका च्या वतीने करण्यात आले आहे.
नेवासा नगरीत साजरी होणार सर्वात मोठी भीमजयंती….
नेवासा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तालुक्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे यासाठी नेवासा शहरातील रस्ते न रस्ते निळया झेंड्यांनी व स्वागत कमानीने बहरलेले असल्याने जयंतीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.