अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीवृत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चोऱ्या, घरफोड्या, हाणामारी, खून आदी प्रकारांत वाढ होत आहे. पोलिसांनी मागील सव्वा वर्षात ६० नव्या टोळ्यांची नोंद अभिलेखावर घेऊन त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. आतापर्यंत ९ टोळ्या तडीपार करण्यात आल्या. ६ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच, ११ टोळ्यांवर मोक्काचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
अभिलेखावर ५६८ सराईत गुन्हेगारांचे हिस्त्रीशिट तयार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या ६१४५ गुन्हेगारांची नोंद करून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात सच्चावर्षात ५१३ नव्या गुन्हेगारांची नोंद करण्यात आली आहे. अभिलेखावर सराईत गुन्हेगार, सराईत टोळ्यांची नोंद करून त्यांचे हिस्ट्रीशिट तयार केले जात आहेत. तसेच, २४० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ८२ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. सहा गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारांवर वचक असण्याची गरज
गुन्हेगारांवर कडक वाचक बसण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस दलाकडून संघटित गुन्हेगारी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते. कारवाईनंतर काही महिन्यातच गुन्हेगार जामीनावर सुटून गुन्हेगारी जगतात कार्यरत होत असल्याचे चित्र असल्याने जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगारांवर अधिक कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्या, सराईत गुन्हेगार यांची माहिती एकत्रित करून रेकॉर्ड तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार सराईत टोळ्या व गुन्हेगारांवर मोक्का, हद्दपारी, एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई प्रस्तावित केली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी म्हटले आहे.
शरीराविषयी व मालाविषयी गुन्हे दाखल होणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का व हद्दपारीची कारवाई करण्यासाठी अधिक भर दिला जात आहे. त्यादृष्टीने गुन्ह्यांचे हिस्ट्रीशिट तपासून प्रस्ताव केले जात आहेत. सध्या १९ टोळ्यांवर मोक्का व १० टोळ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. त्यावर निर्णय प्रलंबित आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.