ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

श्रीकृष्ण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे सुरू असलेल्या श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल काल्याचे कीर्तनाने झाली. वैकुंठवासी बालब्रह्मचारी माधव बाबा लांडेवाडीकर हरिभक्तपरायण भगवान बाबा ,वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने ह भ प. पंढरीनाथ महाराज तांदळे ह भ प रामेश्वर महाराज राऊत शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती यात्रा उत्सव काला कीर्तन प्रसंगी ह भ प रामेश्वर महाराज राऊत शास्त्रीजी यांनी हनुमंताचे स्मरण केल्यानंतर सर्व संकट दूर होतात .

श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्र हे समाजाला संघटना तयार करायचे शिकवतात या करीता सर्वांनी जातीपातीचा विचार न करिता समाज हिताकरिता एकत्र आले पाहिजे. काला म्हणजे जीवाचं आणि ब्रह्मा च ऐक्य , गोकुळातल्या गवळणींनी आपलं संपूर्ण जीवन भगवान कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये समर्पित केलं होतं, माणसाने बोलण्यापेक्षा आचरणाला फार महत्त्व द्यावं, रामचंद्र प्रभूंचं चरित्र आचरणीय आहे व भगवान कृष्ण परमात्म्याचे चरित्र उच्चारणीय असल्याचे सांगितले. शेवटी नारायण दहिफळे व अमोल तांदळे यांचे वतीने महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता झाली. या वेळी हनुमान यात्रा कमिटी मंडळ, आण्णाभाऊ साठे मित्र मंडळ , छत्रपती मंडळ, शिवस्वराज मित्र मंडळ, भगवानबाबा मित्र मंडळ यांनी विषेश परिश्रम घेतले ..

श्रीकृष्ण
श्रीकृष्ण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीकृष्ण
श्रीकृष्ण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीकृष्ण