ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

श्रीनिवास

नेवासा-चिकमंगळूर जिल्ह्यातील( तारीकेरे) मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार जी एच श्रीनिवास यांनी आज सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे शनिमहाराजांचे दर्शन घेतले त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी त्यांचा सत्कार केला.
जी एच श्रीनिवास यांनी तारीकेरे या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविला असून,१९७७ मध्ये रायबरेली मतदारसंघातून माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी चिकमंगळुर या लोकसभा मतदारसंघातून १९७८ साली विजय मिळवला होता अशा ऐतिहासिक जिल्ह्यातील तारीकेरे या विधानसभा क्षेत्रातून जी एच श्रीनिवासा यांनी सलग दोन वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत जाण्याचा मान मिळवला आहे.

श्रीनिवास


आ. जी.एच. श्रीनिवासा यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वणी श्रीनिवासा, कन्या निधी, रचना व जावई चेतन यांनी देखील उदासी महाराज मठात अभिषेक करत शनि देवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करून शनि देवाचे मनोभावे दर्शन घेतले यानंतर जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी त्यांचा शाल व शनि देवाचा प्रसाद देऊन सन्मान केला, संपूर्ण देशात हुकूमशाही सुरू झाली असून लोकशाही टिकवण्यासाठी यंदा देशात काँग्रेस व मित्र पक्षाच्या इंडिया आघाडीचे सरकार यावे यासाठी शनि देवाकडे मनोभावे प्रार्थना केल्याचे देखील यावेळी आ. जी एच श्रीनिवासा यांनी सांगितले.

newasa news online
श्रीनिवास

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीनिवास
श्रीनिवास

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीनिवास
error: Content is protected !!