ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाजप

नेवासा – खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पिक विमा भरलेल्या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावेत अशी मागणी भाजपा नेते मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कपाशी तूर, सोयाबीन इ पिकांचा पीकविमा उतरवला होता परंतु पावसाचा मोठा खंड पडल्याने नेवासा तालुका दुष्काळाच्या ट्रिगर मध्ये बसलेला आहे तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याच्याही अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु अद्याप एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच सोयाबीन या पिकांचे २५% अग्रीम रक्कम मिळाली परंतु उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही.

भाजप

ही रक्कम मिळाल्यास आगामी हंगामामधे शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खते घेण्यासाठी मदत होणार आहे तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन पुढील १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळवून देण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने श्री उन्हाळे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी प्रगतशील शेतकरी राजेश कडु पाटील, आदिनाथ पटारे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजनभाऊ डहाळे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विलास बोरुडे, अजितसिंह नरुला आदी उपस्थित होते.

newasa news online
भाजप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाजप
भाजप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाजप