ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भोजन

नेवासा – तालुक्यातील भालगाव येथील देवगड भक्त परीवारातील रामेश्वर तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 1जून 2024रोजी शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्ध,निराधार,अबाल अनाथ,अपंग आजी आजोबां समवेत वाढदिवस साजरा करून वृध्दाश्रमातील आजी आजोबांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी निखिल शिंगी यांनी शरणपूर वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी हायमॅक्स महिन्याभरात बसविण्याचे आश्वासन दिले. तर संतोष औस्तवाल यांनी वृध्दाश्रमातील वृध्दाची सेवा हि ईश्वर सेवा असून आपण सर्वानीच या सामाजिक कार्यास हातभार लावाल हिच अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी रामेश्वर तनपुरे यांनी मी माझे भाग्य समजतो की या कार्यात मला सेवा करण्यासाठी आज पाचारण करण्यात आले. यावेळेस आसाम(गोहाटी)येथील महिला काल रात्री 10वा शरणपूर वृद्धाश्रमात आली.

भोजन

त्या महिलेची आस्थेने चोकशी करून तीला धिर देत नेवासा पोलीस स्टेशन येथील कर्तव्य दक्ष अधिकारी मा जाधव साहेब! (पी.आय)यांनी त्या महिलेची घरापर्यंत पोहच करण्याची जबाबदारी घेतली असून शरणपूर वृद्धाश्रमास सर्वच स्तरातील दानशूर दाते सहकार्य करत असल्याने यांचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी वृध्दाश्रमाची माहिती देताना काढले. तर अतिशय भावनिक होऊन आसाम मधील महिलेला घरापर्यंत सोडविण्यासाठी भालगाव ता नेवासा येथील कर्तव्य दक्ष तरूणानी हातभार लावण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी भालगाव व पचकोशीतील निलेश तनपुरे, आम्ही नेवासकर न्युजचे सह संपादक अभिषेक गाडेकर, मुकेश तनपुरे, अशोक तनपुरे, किरण तनपुरे, किशोर तनपुरे, राजेंद्र ईरवाड, सुरेश शिंदे , निखिल शिंगी,संतोष ओस्तवाल उपस्थित होते. सर्व मानवराचे स्वागत संस्थेच्या सचिव सुरेखा मगर,व्यवस्थापक संतोष मगर,यांनी केले तर प्रास्ताविक व स्वागत संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी केले.

newasa news online
भोजन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भोजन
भोजन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भोजन