गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंग्डम अॅकडमिच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर ५ जुन हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. जमीन, जंगल पाणी, हवा, यांचे संरक्षण व संवर्धन करीत प्रदूषणाला रोखणे व पर्यावरण विषयक जनजागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. सध्याच्या युगात पर्यावरण विषयक जाग्रुती करणे ही अनिवार्य बाब ठरली आहे.
वृक्ष रोपणाच्या माध्यमातून, शाळेने फक्त झाडाला पोषण दिले नाहीत त्याचबरोबरीने भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या पृथ्वीची संरक्षण करण्याची महत्वाकांक्षा निर्माण केली असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करताना सांगितले. या विशेष दिवशी वृक्ष रोपणाचे कार्यक्रम मोरया चिंचोरे या ठिकाणी आयोजित केले होते. इयत्ता ७वी व ८वी च्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने या मध्ये सहभाग घेत वृक्षारोपण केले.शाळेत नर्सरी ते चौथीच्या चिमुकल्यांनी ग्रीन डे साजरा केला. कार्यक्रम शाळेचे सचिव . सचिन बंग सर, मुख्याध्यापिका कीर्ती बंग मॅडम तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.