ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ज्ञानेश्वर

नेवासा – नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला असून हे ठिकाण ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे हे जन्मस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणाला विशेष असे धार्मिक महत्त्व आहे या ठिकाणी विविध विकासकामे मार्गी लावावे यासाठी सरकारने भरघोस निधी द्यावा अशी मागणी आमदार गडाख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली आहे . या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तसेच कामिका एकादशीला व आषाढी वैद्य एकादशीला लाखो भाविक, वारकरी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना व वारकऱ्यांना मंदिर परिसरात सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव होता.

आमदार शंकरराव गडाख यांनी भाविकांची, वारकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन सन २०११ साली पंढरपूर – देहू – आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून रक्कम रुपये १२.८५ कोटी निधी मंजूर करून घेण्यात आला होता. या निधीतून नेवासा फाटा ते ज्ञानेश्वर मंदिर रस्ता, मंदिपरिस वारकरी सुविधा केंद्र स्थापन करणे, मंदिर परिसरात उद्यान विकसित करणे, नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर मोठ्या फुलाचे बांधकाम करणे, रस्त्यावर विद्युतीकरण करणे, उद्यानात ज्ञानेश्वर महाराजांचे शिल्प उभारणे, ज्ञानेश्वरांचे जीवनावर आधारीत ध्वनीफित व चित्रफित तयार करणे इत्यादी कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत.

ज्ञानेश्वर

मात्र दिवसेंदिवस दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसरात आणखी सुविधांची तातडीची गरज आहे. त्यात भक्तनिवास बांधकाम, व्यापारी संकुल, बहुउद्देशीय हॉल, अंतर्गत रस्ते, पार्किंग क्षेत्र व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे इत्यादी सुविधा होणे अतिशय तातडीचे व गरजेचे आहे. या सुविधा होण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या विश्वस्त मंडळाने रक्कम रू. ७२.६४ कोटीचा निधी मागणीचा प्रस्ताव योग्य त्या पुर्ततेसह माझी नामदार शंकरराव गडाख व जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या शिफारशीने मा. संचालक, पर्यटन संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. तरी सदरचे प्रस्तावास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ गडाख यांनी केली आहे

newasa news online
ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ज्ञानेश्वर
error: Content is protected !!