ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पालक

नेवासा – गुरुवार दिनांक 27 जून रोजी विद्यालयामध्ये माता पालक शिक्षिकासह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सह विचार सभेच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट श्रीमती अनिता मोटे या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ शिरसाट मेघा शिवाजी या उपस्थित होत्या. या सह विचार सभेसाठी दीडशे माता, भगिनीपालक उपस्थित होत्या. या सभेमध्ये विद्यार्थिनींच्या एकूणच प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्याच्या समस्या संदर्भात आणि सुरक्षितते संदर्भात चर्चा झाली.

पालक

शिक्षकांच्या वतीने श्रीमती हापसे एस के आणि श्रीमती झरेकर व्ही एल यानी आपली मनोगते मांडली तर पालकांच्या वतीने सौ रेखा संदीप उगलमुगले सौ मोहिनी कृष्णा डहाळे श्रीमती तारडे ताई यांनी आपला सहभाग नोंदविला. विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पानसरे मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सह विचार सभेमध्ये माता पालक संघ आणि महिला तक्रार निवारण समिती याची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पारखे एस पि यांनी तर सूत्रसंचालन श्रीमती मंजू चव्हाण मॅडमनी यांनी केले आणि सौ भिंगारदिवे एस एस यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

पालक
newasa news online
पालक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पालक
पालक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पालक