ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आहेर

विद्यार्थ्यांना गुन्हेगारी व व्यसना पासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला

पाचेगाव – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाल्याने नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवाजीराव पवार कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या बद्दल चर्चा विनिमय नेवासा पोलीस उपनिरीक्षक मनोज आहेर यांनी केले.

आहेर


उपनिरीक्षक आहेर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ते बोलत होते की,नवीन कायद्यांनुसार काही कलमे हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. १ जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यांवर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच १ जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंद केली जाईल. कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल.कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस, वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार असल्याचे आहेर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपण शिक्षण घेत असताना गुन्हेगारी व व्यसना पासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला यावेळी उपनिरीक्षक मनोज आहेर यांनी दिला.


तसेच नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकरणांची चौकशी आणि सुनावणी केली जाईल. गुन्ह्यांसाठीची प्रचलित असलेले कलम आता बदलण्यात आले आहेत. त्यामुळे न्यायालय, पोलीस आणि प्रशासनालाही नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे असे सांगण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक मनोज आहेर यांचा सत्कार प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार यांनी केला.यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव ढमाळे,प्राचार्य आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ अशोक रामटेके,शिवाजीराव पवार फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य मेघा साळवे,नर्सिंग प्राचार्य निकिता केदारे,आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे निलोफर शेख यांच्या सह आयुर्वेदिक कॉलेज व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

आहेर
आहेर
आहेर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आहेर
आहेर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आहेर