नेवासा – मुकिंदपूर-गिडेगाव रस्त्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज (ता. आठ) रोजी भूमिपूजन आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती रावसाहेब कांगुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, डॉ. शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाल्याने या कामाला सरकारने स्थगिती दिली होती. आमदार गडाख यांनी न्यायालयात धाव घेऊन ही मंजुरी मिळवली असल्याने या कामाला सुरुवात होणार आहे. मुकिंदपूर ते गेवराई या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. मुकिंदपूर, पिचडगाव, गेवराई, गोंडेगाव, बाभूळखेडा, सलाबतपूर, दिघी, म्हसले, नजीक चिंचोली या गावाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता होता.
या रस्त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे. तीन वर्षांपूर्वी मंत्री असताना आमदार गडाख यांनी हा रस्ता मंजूर केला होता. परंतु सरकार बदल झाल्याने या रस्त्याला सरकारने स्थगिती दिली. या विरोधात आमदार गडाख हे न्यायालयात गेले व स्थगिती उठवली.
सरकारने सुमारे ८० कोटींच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्यापैकी काही कामे चालू झाली असून, काही कामे पुढील काही महिन्यात चालू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून नेवासे तालुक्यातील विकासकामांना जाणीवपूर्वक निधी देण्यापासून टाळाटाळ केली जाते. यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्याचे प्रश्न रखडले आहेत. नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे. जाणीवपूर्वक राजकीय सूडबुद्धीने शासनाकडून निधी देण्यात भेदभाव केला जातो आहे, तरीही आमदार गडाख यांचा विकास कामासाठी पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान, मुकिंदपूर-गेवराईसह अन्य गावांच्या ग्रामस्थांची या रस्त्याची मागणी होती. मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार गडाख यांनी शब्द दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी शब्द खरा करून दाखविला याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.