ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गावबंदी

नेवासा : तालुक्यातील बांधकाम कामगार म्हणून दाखले न देणाऱ्या ग्रामसेवकांना गावबंदी करून पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा समर्पण फाउंडेशनने दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बांधकाम कामगार म्हणून दाखले न देणाऱ्या ग्रामसेवकांच्या भूमिकेविरुद्ध संघटनेने धरणे आंदोलन केले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना दाखले देण्याबाबत लेखी आदेश दिले आहेत. तरीही अजून काही ग्रामसेवक दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

गावबंदी

काही ग्रामसेवक कामगारांना दाखल्यांसाठी जाचक अटी लावू पाहत आहेत. हे अन्यायकारक असून बांधकाम मजुरांचे न्याय व हक्क डावलणाऱ्या आहेत. यावेळी तरवडीचे माजी सरपंच बाबासाहेव घुले, चिलेखनवाडीचे सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत, अमोल शेरे मिस्त्री, अजीम सय्यद, गणेश थोरे, हुसेन शेख, नबाब मिस्तरी, अरुण हापसे, गोरक्ष शेरे, बाबासाहेब शेलार, कल्याण हापसे, जालिंदर आगळे, शिवाजी शेरे, राजेंद्र सरोदे, दीपक भोंगळ, बाबासाहेब दातीर, सोपान काळे आदी उपस्थित होते.

newasa news online
गावबंदी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गावबंदी
गावबंदी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गावबंदी
error: Content is protected !!