ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बस

नेवासा – आम आदमी पार्टीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन राज्य परिवहनच्या विभाग नियंत्रकांनी नेवासा आगाराला नव्या बसगाड्या मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. नेवासा तालुक्यात श्री ज्ञानेश्वर मंदिर, श्री मोहिनीराज, श्री खंडोबा म्हाळसा देवी, श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, देवगडचे दत्तमंदिर, बहिरवाडी, वरखेडचे लक्ष्मी आई मंदिर, आदी जगप्रसिद्ध देवस्थानांना धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून दिवसाकाठी लाखो भाविकांची मांदियाळी जमत असते. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्य परिवहन मंडळाच्या नेवासा आगरास नव्या बसगाड्या मिळाल्या नसल्याने जुन्या नादुरुस्त बसगाड्यांवर अवलंबून राहण्याची वेळ ओढवली आहे. बहुतांश बसगाड्या रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाहक मनःस्ताप भोगावा लागतो.

बस

अनेक बसगाड्या उभ्या असल्याने प्रवासी वाहतुकीसाठी नेवासा आगाराला बसगाड्यांची चणचण भासते. कमी बसगाड्यांमुळे प्रवाशांची हेळसांड होत असून, राज्य परिवहनच्या संबंधितांना रोषास सामोरे जावे लागते. तालुक्यात धार्मिक पर्यटनासह इतर कारणांनी मोठ्या प्रमाणावर हक्काचा प्रवासी उपलब्ध असतानाही केवळ पुरेशा तसेच तंदुरुस्त बसगाड्या नसल्याने राज्य परिवहन विभागाला महसुली तोटा सहन करावा लागतो. आपचे तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, संदीप आलवणे, सलीम सय्यद, किरण भालेराव, देवराम सरोदे, करीम सय्यद, अण्णा लोंढे, विठ्ठल मैंदाड, सुमित पटारे, बाळासाहेब साळवे, विठ्ठल चांडे आदींनी एस. टी. प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला होता.

या इशाऱ्याची विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दखल घेऊन महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्याशी पत्रव्यवहार करून नेवासा आगाराला नव्या बसगाड्या देण्याची मागणी केली.

newasa news online
बस
बस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बस
बस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बस
error: Content is protected !!