ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

crime

नेवासा –तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे मागे झालेल्या वादाच्या कारणावरून ८ जुलै रोजी मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने एक ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन आव्हाड (वय ३५, रा. महालक्ष्मी हिवरे) यांच्या फिर्यादीवरून मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप, (रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत्यू

याबाबत गणेश आव्हाड यांनी उपचार घेत असताना फिर्याद दिली की, घरासमोर मोटारसायकलमधून बाटलीमध्ये पेट्रोल काढत असताना आरोपींनी मागील वादाच्या कारणावरून तसेच मावशी व आरोपी यांच्यातील जमिनीच्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी हातातील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडले असता, आरोपी मारुती. मोहन सानप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील काडीपेटीने पेटून दिले. यावरून आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना शुक्रवारी दि.१२ जुलै रोजी मयत झाले. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

newasa news online
मृत्यू
मृत्यू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू