तालुक्याच्या भविष्यासाठी लोकशक्ती आघाडी हाच सशक्त पर्याय – अजित फाटके
नेवासा – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात तिसरा पर्याय देण्याच्या तयारीत असलेल्या आघाडीकडून काल अधिकृतपने लोकशक्ती आघाडीची घोषणा केली. यावेळी अजित फाटके यांनी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींचे सेटलमेंटचे राजकारण व यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष, गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यातील जनतेची होणारी पिळवणूक , दहशत , या सर्व गोष्टींमुळे आजी माजी प्रतीनिधीवरचा जनतेचा उडालेला विश्वास यामुळे नेवासा तालुक्यात जनतेच्या भविष्यासाठी लोकशक्ती आघाडी हाच एकमेव पर्याय आहे असे स्पष्ट केले.
यावेळी तालुक्यातील प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधी आजी माजी लोकप्रतिनिधींना शह देण्यासाठी आम् आदमी पार्टी, शिवसंग्राम, काँग्रेस, बहुजन मुक्ती पक्ष,महाराष्ट्र लहुजी सेना, मराठा सेवा संघ, अशा राजकिय व सामाजिक संघटना एकत्र येऊन लोकशक्ती आघाडीची स्थापना केल्याची घोषणा प्रणाम हॉल या ठिकाणी अजित फाटके यांनी केली.जय शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शेटे यांनी साहेब यांनी तालुक्यातील साखर कारखाना निवडणूक ,शिंगणापूर देवस्थान विश्वस्त निवड, मार्केट कमिटी अशा संस्थांमध्ये आजी व माजी लोकप्रतिनिधींनी हातमिळवणी करून लोकांची दिशाभूल केली. परिणामी शेतकऱ्यांचे ऊस दराचा प्रश्न,ऊस पेमेंट प्रश्न , देवस्थान विश्वस्त निवड, असे प्रश्न सुटले नाही याचे परिणाम जनतेला भोगावे लागले. लोकशक्ती आघाडीची निमित्ताने तालुक्यातील जनतेचे प्रश्न घेवुन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत.
यासाठी येत्या काही दिवसात तालुक्यात लोकन्याय यात्रा काढण्यात येणार असे स्पष्ट केले.काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी तालुक्यातील जनतेचे कूपन, डोल, घरकुल, तरुणांना रोजगार, महिलांना रोजगार, नगरपंचायत मधील पाणी प्रश्न, असे खूप लहान लहान प्रश्न देखिल या दहा वर्षांत सुटले नाही त्यामुळे जनतेला या तालुक्यात कोणी वाली राहिले नाही.लोकशक्ती आघाडीच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहू असे स्पष्ट केले. आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी लोकशक्ती आघाडी ही जनतेची आघाडी असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे, येत्या विधानसभेत जनतेवर दहशत करणाऱ्यांना धडा यामाध्यमातून शिकवणार असे मत व्यक्त केले.
आपचे सादिक शिलेदार यांनी लोकशक्ती आघाडीची कामाची पुढील दिशा,ध्येय धोरण, तसेच आगामी काळातील रणनीती याविषयी मत व्यक्त केले. या घोषणा कार्यक्रमावेळी बहुजन मुक्ति पक्षाचे गणपत मोरे, मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे, आपचे संदिप अलावणे ,काँग्रेसचे अंजुम पटेल,भैरवनाथ भारस्कर, देवराम सरोदे, प्रवीण तिरोडकर, करीम सय्यद, राजू महानोर , शेखर म्हस्के, निवृत्ती जायगुडे, सुमित पटारे, वसंत वांढेकर, बाबा वडगे, आदीसह लोकशक्ती आघाडीत सामील घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते. यावेळी आपचे संदिप अलवणे यांनी सर्व पत्रकार बांधवांचे,उपस्थितांचे आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.