नेवासा – नेवासा फाटा येथील अहिल्यानगर येथे घरफोडी होऊन चार तोळे सोने ते व १५ हजार रुपये रक्कम चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती रामचंद्र भागवत (वय ६१) रा. अहिल्यानगर, नेवासाफाटा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत श्रीगोंदा येथे मुलीला भेटण्यासाठी गेले होते. १४ जुलै रोजी रात्री ९ १५ जुलै रोजी सकाळी ६ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा व गेटचे कुलूप कशानेतरी तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट व शोकेसमध्ये ठेवलेले ४ तोळे सोन्याचे गंठण व १५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.